कधी कधी एकट रहावस वाटत
शांततेत बेभान व्हावस वाटत
कुठेही गोंगाट नकोसा वाटतो
आरडा ओरडा नाहीसा वाटतो
कधी कधी एकट रहावस वाटत
वार्यासोबत दूर दूर जायचं
पाखरान सोबत उडावं अस वाटत
आणि पक्ष्यांचा मधुर आवाजात रमून जावं
कधी कधी एकट रहावस वाटत
आठवणींच्या पावसात भिजाव अस वाटत
विचारांचा महासागरात तरंगाव
स्वतःचा नवा निर्माण करावासा वाटत
कधी कधी एकट रहावस वाटत